भाजपची खेळी, संभाजीराजेंना पाठिंबा देणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

Published on -

Maharashtra news: राज्यसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होताच यासाठीच्या हालचालीही गतिमान झाल्या झाल्या आहेत. शिवसेनेने पांठिबा नाकारलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देऊन भाजप आता नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.

यासंबंधी झालेल्या एका बैठकीत यावर निर्णय घेण्याचे अधिकार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने तिसऱ्या जागेवरही उमेदवार द्यावा, असा एक मतप्रवाह देखील पक्षात आहे.

तसे घडल्यास भाजपच्या गोटातून धनंजय महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, भाजपने ही जागा लढवली तरी महाविकास आघाडीच्या तुलनेत उमेदवार निवडून येण्याची शाश्वती कमी आहे. त्याऐवजी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे यांना पाठिंबा देऊन ‘छत्रपती घराण्याचा सन्मान’ करण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्याची संधी भाजपला आहे.

तेव्हा आता देवेंद्र फडणवीस काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांचे नाव चर्चेत आणले असले तरी त्यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

याचा अर्थ शिवसेनेचेहे अद्याप थांबा आणि पहा धोरण सुरू असल्याचे दिसून येते. तर संभाजीराजे यांच्याकडूनही अपक्ष लढण्याची तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येते. आता संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यावरून सर्वच पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News