शरद पवार म्हणाले, एकदा होऊनच जाऊ द्या…

Published on -

Maharashtra news: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बिहार नंतर महाराष्ट्रात जातीय जनगणना करण्याच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, देशात जातीय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी जनगणना एकदाची होऊन जाऊ दे, म्हणजे न्याय वाटणी होईल. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,

ओबीसी नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अदिती तटकरे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe