Maharashtra news : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंबंधी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा आता सुरू होत आहे.
त्याच्या नियोजनासाठी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तीन सूचना केल्या. नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांचा राज्यात दौरा, नोंदणी सप्ताह सुरू करावा आणि सर्व कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन राज ठाकरे यांनी जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र घरोघरी पोहचवायचे आहे.

पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी यांबंधी सुतोवाच केले होते. ते म्हणाले होते, भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत.
हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे.
प्रत्येक वेळी ते रस्त्यावरच केलं पाहिजे असं नाही. पण त्यांचं सहकार्य आवश्यक आहे. तर या गोष्टी बंद होतील.
आता लवकरच हे पत्र घरोघरो पाठविले जाणार आहे. त्या पत्रात ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे लवकरच कळेल.