Govt Clarification on Aadhaar :आपल्या आधारकार्डची झेरॉक्स कोणालाही देऊ नका. त्यामुळे गैरवापर होण्याची शक्यता आहे, असं पत्रक केंद्र सरकारने सकाळी जारी केलं. मात्र, त्यावर टीका होऊ लागल्यानं दुसरं पत्रक जारी करून आधीच्या पत्रकातील नियमावली मागे घेतली.
त्यामुळे लोकांच्या मनात आता आधारकार्डच्या गैरवापरासंबंधीच्या शंका कायम आहेत. सध्या प्रत्येक कामासाठी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते, लोकही ती बिनधास्त देतात, आता मात्र यावरून वादाचे प्रसंग होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने आज सकाळी आधार कार्ड वापरासंबंधीची एक नियमावली जारी केली. आधारकार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळं मास्कड आधार कार्डचा वापर करावा, अशी सूचना त्यात केली होती. प्रत्येक संस्थेला तुमच्या आधार कार्डची प्रत (फोटोकॉपी) देऊ नका.
अन्यथा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. फोटोकॉपीऐवजी मास्कड आधार कार्डचा वापर करा. मास्कड आधार कार्डमध्ये आधार क्रमांकातील केवळ शेवटचे चार आकडेच दिसतात, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र यावरून टीका सुरू झाली. गेल्या दहा वर्षांत लोकांनी ठिकठिकाणी आधार कार्डच्या प्रती दिल्या आहेत.
त्यांचा गैरवापर होऊ शकतो का? हे सुरक्षित नाही का? तसे असेल तर यापूर्वीच ही सूचना का दिली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर सरकाराने आधाची नियमावली मागे घेत असल्याचे जाहीर केले.
आधार कार्डची प्रत कुठेही जमा न करण्याबाबतचा चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता लक्षात घेऊन आदेश मागे घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. असे असले तरी लोकांच्या मनातील शंका आणि गोंधळ कायम आहे.