भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादीला, पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Published on -

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.


ते शनिवारी सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिले होते. मी राष्ट्रवादीला मत देणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केले आहे.

मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी या सगळ्यात पडलो नाही. तरीही विरोधी गटातील एका आमदाराने स्वत:हून राष्ट्रवादीला मतदान केले. हा आमदार भाजपचा नसून अपक्ष आहे.

पण तो भाजपच्या गटातील आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.निकालासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे.

अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही. महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत, ती अपक्षांची आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News