India News : इंडियन आर्मी अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ आणि भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ जारी करण्यात आली आहे. हवाई दलात २४ जून, नौदलात २५ जून आणि लष्करात १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट careerairforce.nic.in वर करता येणार आहे. तर joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आर्मी अग्निवीर भरतीसाठी अर्ज करता येईल.

- हवाई दलाकडून २४ जूनपासून अर्ज प्रक्रिया
-नौदलाकडून २५ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील
-लष्करासाठी १ जुलै २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरू
-आर्मी अग्निवीरची वेगवेगळ्या ट्रेडमध्ये भरती - ट्रेड्समनसाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण
- सामान्य ड्युटीसाठी दहावी उत्तीर्ण
- तांत्रिक, स्टोअर कीपर आणि लिपिकासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
- उमेदवारांचे वय १७ वर्षे ५ महिने ते २३ वर्षांदरम्यान असावे
-अर्ज आणि माहितीसाठी लिंक :
http://careerairforce.nic.in/
https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx