Ahmednagar News : पत्र्याच्या शेडमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे शॉक बसून शेतकरी कुटुंबील दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तारेला अडकविलेली दुधाची बादली काढण्यासाठी गेलेल्या लहान भाऊ गेला असता त्याला शॉक बसला पाठोपाठ त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावालाही शॉक बसला आणि दोघांचाही मृत्यू झाला.कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे आज सकाळी ही घटना घडली.
सचिन हनुमंत धुमाळ (वय २७) व अमोल हनुमंत धुमाळ (वय ३०) अशी त्या भावांची नावे आहेत. बेनवडी येथील शेतकरी हनुमंत धुमाळ यांच्या शेतात जनावरांसाठी पत्र्याचे शेड आहे. सकाळी हे दोघे भाऊ तेथे काम करीत होते.
दुधाची बादली शेडमधील तारेला अडकविलेली होती. ती काढण्यासाठी लहान भाऊ सचिन गेला. मात्र, शेड आणि तारेत वीज प्रवाह उतरेला होता. त्यामुळे विजेचा धक्का बसून सचिन तेथेच अडकला. हे पाहून मोठा भाऊ अमोल त्याच्या मदतीला धावला. तर त्यालाही विजेचा शॉक बसला. यातून दोघांनाही सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.