रिलायन्स जिओ’मध्ये उलथापालथ, मुकेश अंबानी यांचा राजीनामा

Published on -

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाने मुकेश अंबानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामाही स्वीकारला असून त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आता रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष होणार आहेत.

२७ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.याआधी आकाश अंबानी बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. कंपनीने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजमध्ये केलेल्या फाइलिंगमध्ये ही बाब समोर आली आहे. आता मुकेश अंबानी हे जिओ प्लेटफॉर्म लिमिटेड चे अध्यक्ष राहतील.

आकाश अंबानी, ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवीधर होण्यापूर्वी, त्यांचे वडील मुकेश अंबानी चेअरमन म्हणून कंपनीचे काम पाहत होते.आणखी एक मोठा बदल करताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने पंकज पवार यांची पुढील ५ वर्षांसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

अतिरिक्त संचालक रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही. चौधरी आता स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांची नियुक्तीही ५ वर्षांसाठी असेल. भागधारकांच्या मान्यतेनंतरच या नियुक्त्या वैध असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News