अबब ९ फूट लांब, ७ किलो वजनाचा अजगर संगनेरच्या रस्त्यावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी मध्यरात्री ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर आढळला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वनविभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे.

सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशाल नामदेव शिदें हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना एक मोठा साप रस्ता ओरडताना दिसला.

त्यामुळे परिसरातील नागरीकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून शिदें यानी स्थानिक नागरीकाना याबाबत माहिती देऊन सर्पमित्र शिवाप्रसाद पवार याला संपर्क केला.

घटनेचे गांभीर्य ओळखत सर्पमित्र शिवाप्रसाद पवार ऐ घटनास्थळी दाखल झाले. थोड्या वेळातच मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन हा अजगर असल्याची माहिती उपस्थिताना दिली.

मंगळवारी सकाळी वनक्षेत्र अधिकारी एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे व वनरंक्षक रामकृष्ण सांगळे यानी या अजगराला ताब्यात घेऊन हा तीन वर्षे वय असलेला मादी अजगर असल्याची माहिती दिली. सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व डॉ. अनिल क्षीरसागर यांच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त केले. यावेळी संजय गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.