महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्याच्या घडीला मोठी बातमी आली आहे. एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर कोसळून ते क्रॅश झाल्याचे वृत्त आले आहे. सु
दैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईत पोहोचवले होते.
दरम्यान या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले अन सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु त्यानंतर काहीच वेळात आम्ही सगळे सुखरूप असल्याची माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
अंधारे यांना नेण्यासाठी जे हेलिकॉप्टर आले होते ते महाडमध्ये क्रॅश झाले आणि याच हेलिकॉप्टरमधून जयंत पाटील मुंबईत पोहोचले होते आणिहेच हेलिकॉप्टर महाड नंतर बारामतीला जाणार होते. त्यामुळे या अपघातामुळे होणार मोठा अनर्थ टळला असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.
अंधारे या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाडहून येथून निघालेल्या होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आलेल्या होत्या. त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात हा प्रकार घडला होता. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तांत्रिक बिघाड झाला होता ?
हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन हा अपघात झाला असावा असे म्हटले जात आहे. हे हेलिकॉप्टर सकाळी पावणे नऊ वाजता उतरून ९ वाजता उड्डाण करणार होते.
परंतु बराच वेळ ते हेलिकॉप्टर हवेतच राहिले व त्याला उतरण्यासाठी बराच वेळ लागला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ते खाली उतरत असताना कोसळून त्याचे तुकडे झाले. दरम्यान यातून सर्वचजण वाचल्याने मोठा अनर्थ टळला असे म्हटले जात आहे.