अहमदनगर लाईव्ह 24 टीम / न्यूयॉर्क :- अमेरिकेतील वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय भारतीय युवकाचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
विवेक सुब्रमणी असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी बटणवूड रस्त्यावरील आपल्या अपार्टमेंटच्या एका छतावरून दुसऱ्या छतावर उड्या मारत असताना तोल गेल्याने विवेक हा खाली कोसळला.
यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रदेखील होते. मित्रांनी तत्पूर्वी मद्य प्राशन केल्याचे पोलिसांकडे कबूल केले.
ड्रेक्सेल वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असलेल्या विवेकच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात आहे.