ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश, म्हणजे ते पत्र…

Published on -

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आज सकाळीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आहे.

त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. काल रात्री अशाच अशायचे एक पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले होते. मात्र, त्यावर राज्यपालांची सही नव्हती, त्यामुळे ते खोटे असल्याचा खुलासा राजभवनाकडून करण्यात आला.

अखेर आज सकाळी तसेच पत्र जारी सहीसह जारी झाले आहे.दरम्यान हा विषय पुन्हा सुप्रिम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेते प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे.

याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू. त्यामुळे आज दिवसभर पुन्हा कायदेशीर लढाई रंगणार आहे. तर आपण सर्व आमदारांसह मुंबईला येत असल्याचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यानुसार येण्याची तयारीही सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News