Tomato Farming: टोमॅटो शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती…! ‘या’ टोमॅटोच्या जाती देतील बंपर उत्पादन, मिळणार लाखोंच उत्पन्न

Published on -

Tomato Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करू लागले आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. देशात तसेच राज्यात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात टोमॅटो या भाजीपाला पिकाची लागवड (Tomato Cultivation) करत असतात. भारतातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील हवामान टोमॅटो पिकासाठी (Tomato Crop) अनुकूल असल्याने याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

गेल्या काही महिन्यात टोमॅटोला चांगला बाजारभाव (Tomato Rate) मिळाला असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Grower Farmer) याचा मोठा फायदा झाला असून अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लाखों रुपयांची कमाई (Farmers income) केली आहे. टोमॅटो पीक कमी खर्चात आणि अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असल्याने शेतकरी बांधव यांच्या लागवडीला अधिक पसंती दर्शवीत आहेत.

अशा परिस्थितीत, आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी टोमॅटो पिकाच्या काही सुधारित जातींची (Tomato Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. शेतकरी मित्रांनो जर आपणास देखील टोमॅटो लागवड करायची असेल तर निश्चितच ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया टोमॅटोच्या काही सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता. 

शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड करताना नेहमी सुधारित जातींची निवड करावी:-

सध्या देशात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. यातील अनेक भागात टोमॅटोला सध्या 80 रुपये प्रति किलोपर्यंत चा बाजार भाव प्राप्त होत आहे. या परिस्थितीत टोमॅटोची शेती शेतकऱ्यांसाठी लाखों रुपये उत्पन्न करून देत आहे. मात्र टोमॅटोला जरी एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला नाही तरी देखील टोमॅटोची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. कृषी तज्ञांच्या मते, टोमॅटो हे एक वजनदार पीक आहे अशा परिस्थितीत टोमॅटोला कमी बाजार भाव मिळाला तरीदेखील वजनाला अधिक असल्याने टोमॅटो शेतीतून शेतकऱ्यांना निश्चितच चांगला नफा मिळत असतो.

शिवाय टोमॅटो शेती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे टोमॅटोला बारामाही मागणी असते. यामुळे टोमॅटो लागवड शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. मात्र असे असले तरी टोमॅटो शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी टोमॅटोच्या सुधारित जातींची निवड करावी असा सल्ला कृषी तज्ञ देत असतात. अशा परिस्थितीत आज आपण टोमॅटोच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल आणि उत्पन्न वाढेल.

टोमॅटोच्या काही सुधारित जाती:-

अर्का रक्षक:- शेतकरी मित्रांनो ही एक टोमॅटोची प्रगत जात आहे. या जातीचे टोमॅटो पीक उच्च उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. या जातीचे टोमॅटो आकाराने गोलाकार असतात. या जातीच्या टोमॅटोच्या कलर बद्दल बोलायचे झाले तर यांचा कलर गडद लाल असतो. शिवाय या जातीचा टोमॅटो हा मजबूत असतो. यामुळे या जातीचा टोमॅटो बराच काळ ताजा राहतो. यामुळे या जातीच्या टोमॅटोचा सर्वाधिक वापर प्रक्रिया उद्योगात केला जातो.

ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे शिवाय या जातीचे टोमॅटो रोग प्रतीरोधक आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होणार आहे शिवाय  या जातीची लागवड केल्यास उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे. या जातीचे टोमॅटो 140 दिवसात उत्पादनासाठी तयार होतात. या जातीच्या टोमॅटो पासून हेक्‍टरी 80 क्विंटल उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो.

वैशाली :- टोमॅटोची ही एक संकरित जात आहे. हे वाण संकरित असल्याने उच्च उत्पादन देणारी असते. या जातीचे टोमॅटो आकाराने मात्र लहान असतात. या जातीच्या टोमॅटोचे सर्वसाधारण वजन 100 ग्रॅम असते. टोमॅटोची ही संकरित जात उष्ण व दमट हवामानात उत्तम असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. हे वाण देखील प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या जातीच्या टोमॅटो पासून मोठ्या प्रमाणात केचअप बनवले जाते.

अर्का वरदायनी:- शेतकरी मित्रांनो या दोन जातींशिवाय अर्का वरदायनी ही देखील टोमॅटोची एक प्रगत जात आहे. हे वाण उच्च उत्पन्न देणार वाण म्हणून ओळखलं जातं. या जातीच्या टोमॅटोचे वजन 140 ग्रॅम पर्यंत असते. तथापि, या जातीच्या टोमॅटोला परिपक्व होण्यासाठी उशीर होतो. अर्थात या जातीचे टोमॅटो लागवड केल्यानंतर उशिरा उत्पादन देण्यास तयार होतात. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांसाठी ही जात देखील फायद्याची ठरू शकते.

रुपाली:- ही देखील टोमॅटोची एक प्रगत जात आहे. या जातींचे टोमॅटो मध्यम आकाराचे असतात. निश्चितचं ही देखील जात शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

रश्मी:- रश्मी ही देखील टोमॅटोची एक प्रगत जात आहे. भारतात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. टोमॅटोची ही जात अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असल्याने शेतकरी बांधव या जातीची लागवड करत असतात. निश्चितच कमी वेळेत उत्पन्न मिळवण्यासाठी या जातीची देखील शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe