Hair Fall : केस गळतीने त्रस्त आहात? घरच्या घरीच करा केसगळतीवर उपाय

Ahmednagarlive24 office
Published:

Hair Fall : आपल्या काही वाईट सवयीनमुळे केस गळू (Hair Fall) लागतात. थोड्याफार केसांच्या गळतीकडे दुर्लक्ष करता येतं. मात्र, केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर, टक्कल (Bald) पडण्याची भीती असते.

डोक्यावरचे केस कमी झाले तर, आपली आवडती हेअर स्टाईल (Hair Style) देखील करता येत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला ( event) जाताना आवडते कपडे घातल्यानंतर देखील आपल्या केसांकडे लक्ष जात राहतात.

या कारणांमुळे केस गळतात

केस गळण्यामागे कोणतेही एक कारण नसते हे सर्वांनाच माहीत आहे. उलट त्यामागे अनेक कारणे आहेत. केस गळणे हे आहार, खराब पाणी, तणाव आणि वृद्धत्व यांच्याशी देखील संबंधित आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सर्वप्रथम तुमची जीवनशैली बदलावी लागेल आणि खाण्यापिण्याकडे (Diet) विशेष लक्ष द्यावे लागेल. तरच केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

कोंड्याची समस्या ‘या’ टिप्सने दूर होईल
नैसर्गिक पद्धतीने केसांमधील कोंड्याच्या (Dandruff) समस्येपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. बिअरसोबत (Beer) अंडी (Egs) वापरल्याने केस दाट होऊ शकतात. अंड्यांसह केस रेशमी आणि सुंदर होऊ द्या. अंड्यांसोबत बिअरचा वापर केल्याने कोंड्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe