अहमदनगर लाईव्ह 24 टीम / निंबेनांदूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज़ घुले यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे डॉ. क्षितीज घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर तसेच ग्रामस्थांच्या वतीने घुले यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी डॉ. घुले बोलत होते.
याप्रसंगी गोरक्ष जमधडे, संजुभाऊ कोळगे, डॉ. सुधाकर लांडे यांची भाषणे झाली. सत्कारास उत्तर देताना सभापती डॉ. क्षितीज घुले म्हणाले, वाघोली येथील युवकांनी राजकीय अपेक्षा न ठेवता हा सामाजिक उप्रकम राबवला. वाघोली येथे एक छोटेसे रोपटे लावले.
त्या रोपटयाचे आता वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही. एक वर्षापूर्वी युवकांनी हा उपक्रम वाघोलीत सुरू केला,असा उपक्रम शेवगाव तालुक्यातील युवकांनी गावोगावी राबवावा,असे आवाहन त्यांनी केले.
विकासकामे करताना निधी मिळण्यासाठी अडचणी येतात, त्यासाठी शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातील आमदार आपल्या पक्षाचा असणे आता गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही याप्रसंगी घुले यांनी दिली.