Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला आहे. तसे त्यांनी पत्र कंपनीला पाठवले आहे. मस्क यांनी ट्विटरला ५४.२० बिलियन डॉलर्समध्ये खरेदीची ऑफर दिली होती. अखेर ४४ बिलियन डॉलर्समध्ये सौदा झाला होता.
मात्र आता इलॉन मस्क यांनी ट्विटरवर असलेल्या फेक खात्यांच्या मुद्द्यांवरून हा करार रद्द केला आहे. यामुळे ट्विटरकडून इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास दोन महिन्यांपासून सुरू होती.

मात्र “ट्विटरने करारातील अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे हा करार रद्द करत आहे.” असे सांगून मस्क यांनी हा व्यवहार रद्द केला. मस्क यांनी खरेदीचा करार रद्द केल्यानंतर कंपनी आता न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. असे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी म्हटले आहे.