शिंदे-फडणवीसांनी दिल्लीत जागविली रात्र, नेमकं काय ठरलं?

Maharashtra news:रात्रीच्या गोपनीय भेंटीमधून स्थापन झाल्या शिंदे-फडणवीस सरकारची रात्रीची जागरणे सुरूच आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.

रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेली त्यांची बैठक पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येते.राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दोघांचा शपथविधी झाला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामध्ये कोणाचे किती मंत्री, कोणाला कोणती खाती यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून दाखल केलेल्या विविध याचिकांमुळे या सरकारला कायदेशीर लढाईला समोरे जावे लागणार आहे. त्यासंबंधीही या बैठकीत चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.