पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी उचलले पाऊल देशातील नागरीकांसाठी अमृत गिफ्ट

Ahmednagarlive24
Published:

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर देशातील १८ वर्षापुढील नागरीकांना मोफत बुस्‍टर डोस देण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयाचे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी उचलले पाऊल देशातील नागरीकांसाठी अमृत गिफ्ट ठरले असल्‍याची प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

यापुर्वी कोव्‍हीड संकटावर मात करण्‍यासाठी केंद्र सरकारने सुरुवातील जेष्‍ठ नागरीकांसाठी मोफत लसिकरण मोहीम केली होती. त्‍यानंतर १८ वर्षांवरील नागरीकांना मोफत लस देण्‍याचा निर्णय करुन, देशातील कोट्यावधी नागरीकांना दिलासा दिला होता. राहाता तालुक्‍यात लसिकरणाबाबत सेवाभावी संस्‍था, आरोग्‍य क्षेत्रातील आधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्‍या जनजागृतीमुळे तालुक्‍यात सर्वाधिक लसिकरण पुर्ण झाले होते याकडे लक्ष वेधून आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, कोव्‍हीड संकटातून देशाला मुक्‍त करण्‍यासाठी केंद्र सरकारने आता बुस्‍टर डोस देण्‍याचा निर्णय करुन, स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात देशाला मोठे अमृत गिफ्ट दिले असल्‍याचे सांगितले.

या पार्श्‍वभूमिवर केंद्र सरकारने स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष लक्षात घेवून, पुढील ७५ दिवस बुस्‍टर डोस मोफत देण्‍याचा निर्णय घेतल्‍याने देशातील नागरीकांना पुन्‍हा मोठा दिलासा दिला आहे. एकीकडे कोव्‍हीड संकटाचे रुग्‍ण वाढत असताना केंद्र सरकारने तिसरा बुस्‍टर डोसही मोफत उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय केल्‍याने याचा लाभ नागरीकांनी घ्‍यावा. आपल्‍या गावात, परिसरात असलेल्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्‍ये तिसरा बुस्‍टर डोस उपलब्‍ध होणार असून नागरीकांनी केंद्र सरकारच्‍या या योजनेचा लाभ घ्‍यावा. तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी, सेवाभावी संस्‍थानी तसेच आरोग्‍य क्षेत्रातील आधिकारी, कर्मचा-यांनी समन्‍वयातून पुढील ७५ दिवसांचे नियोजन करुन, तिसरा बुस्‍टर डोस घेण्‍यासाठी नागरीकांना प्रोत्‍साहीत करावे असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe