31st July Deadline : सर्वांसाठी जुलै महिना (July Month) हा खूप महत्वाचा महिना आहे. कारण याचं महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाची कामे (Work) पूर्ण करावी लागणार आहे.
यामध्ये ITR फाइलिंगशी संबंधित काही कामे तसेच PM किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Fund) योजनेअंतर्गत EKYC करून घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ही महत्वाची कामे पूर्ण करा नाहीतर तुमच्यावर आर्थिक ताण येऊ शकतो.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत EKYC
तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 31 जुलै 2022 पूर्वी EKYC करून घ्या. सरकारने पीएम किसान योजनेत eKYC साठी 31 जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.
अशा स्थितीत हे काम लवकरात लवकर 31 जुलैपूर्वी पूर्ण करावे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट देऊन तुम्ही तुमचे eKYC करू शकता.
ITR भरण्याची शेवटची तारीख
वैयक्तिक आणि पगारदार कर्मचारी ज्यांना खाते ऑडिटची (Audit) आवश्यकता नाही. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख म्हणून त्यांना 31 जुलै 2022 निश्चित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नोंदणी करण्याची शेवटची तारीख
प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. जर तुम्ही पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी करण्याचा विचार करत असाल. अशा स्थितीत हे काम निश्चित मुदतीपूर्वी करावे.
तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेत ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता. यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता. याशिवाय जवळच्या बँक शाखा, सहकारी बँक समिती, लोकसेवा केंद्र येथे जाऊन पीक विमा योजनेत नोंदणी करता येते.