Maharashtra News:विविध कारणे सांगून सर्वसामान्यांना गंडा घालणारे सायबर चाचे आपण नेहमी पहतो. एका सायबर ठगाने चक्क आमदारांनाच ठकविले आहे. एक नव्हे तर तब्बल चार महिला आमदारांना त्याने गंडा घातला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या विविध मतदारसंघातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे.

मुकेश राठोड नावाच्या तरुणाने आपली आई आजारी असल्याचे या आमदारांकडे मदत मागितली होती. ती समोर येऊन नव्हे तर ऑनलाइन पद्धतीने. आणि आमदारांबनीही त्याच्या बोलण्याला भूलून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली.
मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.