Farmer Scheme: भले शाब्बास मायबाप सरकार…! आता नवयुवकांना पशुपालन, डेअरी फार्मिंगसाठी मिळणार 24 लाखांचं अनुदान; वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Farmer Scheme: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. जाणकार लोकांच्या मते शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून शेतकरी बांधव पशुपालन करीत आले आहेत. खरं पाहता शेतकरी बांधवांच्या (Farmer) उदरनिर्वाहासाठी पशुपालन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

पशुपालनामुळे शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे. पशुपालन व्यवसायाचे महत्व ओळखता मायबाप शासन देखील या व्यवसायाला (Cow Rearing) चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपल्या देशात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि पशुपालकांना समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) अनेक नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करत असते.

केंद्र शासनाप्रमाणेचं अनेक राज्यातील राज्य सरकारे देखील अनेक योजनांवर (Scheme) काम करत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या योजनेतून पशुपालक शेतकऱ्यांना समृद्ध बनण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून पशूपालक शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज आणि अनुदानही दिले जाते. नाबार्ड आणि बँका या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शेती आणि पशुपालन व्यवसाय चालवण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून केली जात आहे. हिमाचल प्रदेश राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच पशुपालनाला चालना देण्यासाठी एक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणली आहे. हिमाचलप्रदेश मधील शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी मदत दिली जात आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना दूध गंगा योजनेंतर्गत कमी दरात जास्तीत जास्त 24 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दूध गंगा योजना काय आहे

  • या योजनेंतर्गत हिमाचल प्रदेशातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिले जात आहे. हे अनुदान हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या गायी आणि म्हशींच्या खरेदीसाठी देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील दुग्धउत्पादक लघुउद्योगांचेही दुग्ध व्यवसायात रूपांतर करण्यात येणार असून त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढून ते स्वावलंबी बनतील असा आशावाद मायबाप शासन करत आहे.
  • दूध गंगा योजनेअंतर्गत, पारंपारिक दुग्धशाळा मशिन आणि उपकरणांनी सुसज्ज स्मार्ट डेअरी फार्मिंगमध्ये रूपांतरित केल्या जातील.
  • या योजनेंतर्गत उत्तम जातीचे दुधाळ जनावरे तयार करण्यासाठी लहान जनावरांनाही संरक्षण दिले जाईल.
  • या योजनेतून आधुनिक डेअरी फार्म बांधले जातील, त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतील.
  • हे काम सुलभ करण्यासाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी 33 टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद आहे.
  • दुसरीकडे, सर्वसाधारण श्रेणीतील शेतकऱ्यांना 25% पर्यंत अनुदान दिले जाईल.
  • या योजनेद्वारे जनावरांच्या खरेदीसाठीही अनुदान दिले जाणार असून यामध्ये देशी गाई-म्हशीसाठी 20 टक्के आणि जर्सी गाईसाठी 10 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

दुग्ध व्यवसाय अनुदानासाठी पात्रता

दूध गंगा योजनेअंतर्गत, आर्थिक अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकरी, दुधाशी संबंधित वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, दूध उत्पादक कंपन्या, असंघटित आणि संघटित क्षेत्रातील गट यांचा समावेश करण्यात आला आहे.  याशिवाय संघटित क्षेत्रातील गटांमधील बचत गट, दुग्ध सहकारी संस्था, दूध संघ देखील अनुदान आणि कर्जासाठी अर्ज करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe