Vegetable Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) लागवड केली जात आहे. कारले (Bitter Gourd Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे.
या पिकाची शेती (Bitter Gourd Farming) आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कारल्याला बाजारात बारामाही मागणी असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmer) या पिकाच्या शेतीतून (Farming) निश्चितच चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) करू शकणार आहेत.
जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना कारले या भाजीपाला पिकाची शेती करण्याचा सल्ला देत असतात. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी जर कारले पिकाच्या सुधारित जातींची लागवड केली तसेच योग्य व्यवस्थापन केले तर त्यांना निश्चितच या पिकातून चांगली कमाई होणार आहे. मित्रांनो कोणत्याही पिकाच्या लागवडी पुर्वी त्याच्या सुधारित जातींची निवड करणे तसेच माती परीक्षण करून पिकासाठी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य पोषण व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक राहणार आहे.
त्यामुळे कारले पिकाची लागवड करण्याअगोदर त्याच्या सुधारित जाती माहिती करून घेणे तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याची निवड करणे आणि माती परीक्षण करून त्यांची लागवड करणे हे कारल्याच्या शेतीचे यशाचे गमक ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कारल्याच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण अरका हरित या कारल्याच्या सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कारल्याची सुधारित जात अरका हरीत
अर्का हरित भारतातील एक सुधारित कारल्याची जात आहे. या जातीची लागवड उत्तर प्रदेश राज्यात प्रामुख्याने केली जात असल्याचे सांगितले जाते. या जातीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते, कारल्याची ही एक उत्कृष्ट जात आहे. या जातीपासून चांगले आणि निरोगी उत्पादन मिळते. या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक कारल्याच्या रोपाच्या प्रत्येक वेलीमध्ये 50 पर्यंत फळे लागतात.
या कारल्याच्या जातीपासून मिळणारे कारले चवीला उत्तम, निरोगी तर असतातच शिवाय कारली खूप लांब आणि 100 ग्रॅम पर्यंत त्यांना वजन असते. जाणकार लोक या जातीच्या कारल्यापासून 1 एकरात सुमारे 50 क्विंटल कारल्याचे चांगले उत्पादन मिळत असल्याची माहिती देत असतात. या कारल्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कारल्याच्या फळात फारशा बिया आढळत नाहीत. अशा परिस्थितीत या कारल्याला बाजारात कायम मागणी असते आणि चांगला बाजारभाव मिळतं असतो.