रणबीर-आलियाचं शुभमंगल!

Published on -

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रणबीर आणि आलियाने चक्क लग्न करायचं मनावर घेतलंय आणि तेही याच वर्षी! यो दोघांचं रिलेशनशिप उत्तम असलं, तरी ते दोघं सध्या तरी करिअरकेड लक्ष देतील असं अनेकांना वाटत होतं, पण जर्नलिस्ट राजीव मसंद यांनी ‘ओपन मॅगझिन’साठी घेतलेल्या मुलाखतीत दोघांनी हे गुपित उघड केलंय.

डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा दोघांचा विचार असून घरच्यांशीही यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ याच वर्षी ४ डिसेंबरला रिलीज होईल व हे क्यूट कपलही याच दरम्यान विवाहबंधनात अडकेल अशी शक्यता आहे.

यापूर्वीही रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा पसरत होत्या, आता मात्र त्यांनीच या माहितीला दुजोरा दिल्याने या डिसेंबर हा लग्नसोहळ पार पडेल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News