Wheat Farming : येत्या रब्बी हंगामात संधीच सोन करा! गहू लागवडीचा बेत असेल तर ‘या’ जातीची लागवड करा आणि लाखो कमवा

Ajay Patil
Published:

Wheat Farming : भारतात आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabbi Season) प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पीक व्यवस्थापनाची (Crop Management) कामे सुरू असून खरीप हंगाम आगामी काही दिवसात संपुष्टात येणार आहे. मित्रांनो देशात खरीप हंगाम हा जवळपास आता अंतिम टप्प्यात आला आहे.

येत्या काही दिवसात खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर राहणार आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आता रब्बी हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे तसेच खतांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे रब्बी हंगामात संपूर्ण भारत वर्षात गव्हाची (Wheat Crop) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

आपल्या महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे गव्हाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मात्र जाणकार लोकांच्या मते गहू लागवडीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित वाणांचीचं (Wheat Variety) पेरणी केली पाहिजे.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी (Farmer) वाचक मित्रांसाठी महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या दोन गव्हाच्या प्रमुख जाती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण तपोवन आणि त्र्यंबक या दोन गव्हाच्या जाती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती खालीलप्रमाणे :

तपोवन (एनआयएडब्ल्यू : 917) :- गव्हाची ही एक सुधारित जात असून बागायती क्षेत्रासाठी उत्कृष्ट जात म्हणून ओळखली जाते. गव्हाच हे एक उत्कृष्ट सरबती वाण आहे. या गव्हाची वेळेवर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते. या गव्हाच्या जातीची वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस केली गेली आहे. या जातीच्या गव्हात ओंब्याची संख्या जास्त असते मात्र दाणे मध्यम असतात. या जातीच्या गव्हात प्रोटीन साडेबारा टक्के आढळते.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचा गहू गहू पिकासाठी घातक ठरणारा तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे. शिवाय या जातीच्या गव्हाच्या पिठापासून उत्कृष्ट दर्जाचा चपात्या तयार होत असतात. यामुळे बाजारात या जातीच्या गव्हाला मोठी मागणी असते. पेरणी केल्यापासून एकशे पंधरा दिवसात या जातीचा गहू काढणीसाठी तयार होत असतो. जाणकार लोक या जातीच्या गव्हापासून तब्बल पन्नास क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा करत आहेत. या जातीची संपूर्ण महाराष्ट्रात लागवड पाहायला मिळते.

त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू : 301) :- गव्हाचे हे वाण देखील संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादित केले जात आहे. गव्हाचे हे वाण सुधारित वाण म्हणून ओळखले जाते. बागायती भागात वेळेवर पेरणीसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. हे देखील एक मुख्य सरबती वाण म्हणून ओळखले जाते. या जातीच्या गव्हाचे दाणे टपोरे आणि मोठ्या आकर्षक असतात.

या जातीच्या गव्हात बारा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रोटीन आढळते. गव्हाची ही जात देखील गव्हासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे. या जातीच्या गव्हाच्या पिठापासून देखील उत्कृष्ट दर्जाच्या चपात्या बनत असतात. अशा परिस्थितीत या जातीची देखील बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला बाजारभाव देखील मिळतो. या जातीच्या गव्हाची पेरणी केल्यानंतर अवघ्या 115 दिवसात उत्पादन मिळते. या जातीची महाराष्ट्रात शेती केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe