अंगावर डिझेल ओतले अन कडी ओढली…. मात्र खाकी आडवी आली…?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News :खासगी सावकारांवर कारवाई करून त्याने हडप केलेली जमीन परत मिळावी म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र , पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच रोखला. सुनील शंकर नगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील शंकर नगरे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात येत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत बाटली भरून आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले मात्र येथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याच्या ताब्यातून डिझेलची बाटली आणि काडीपेटी काढून घेतली.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यापूर्वी कर्जत तालुक्यातील एकाने काही वर्षांपूर्वी असाच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने यात गंभीर जखमी होऊन त्याचा त्यात मृत्यू झाला होता.

या घटनेग मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील दुर्घटना टळली. त्याच्याकडे आढळून आलेल्या निवेदन हे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे आहे. उख्खलगाव (ता. श्रीगोंदे) येथील एक महिला आणि एक पुरूष तसेच रांजणगाव मशिद (ता. पारनेर) येथील एका अशा तीन सावकरांकडून शेतीच्या सुधारणेसाठी वेळोवेळी दोन लाख ५० हजार रूपये घेतले होते.

अनामत म्हणून म्हसणे गावातील गट नंबर ३३५ मधील जमीन लिहून दिली होती. या तिन्ही सावकरांनी पैसे परत दिल्यास जमीन पुन्हा परत देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते.

नोटरीसमोर हा करारनामा केला होता. त्यानंतर सावकरांनी सुमारे दहा लाख रूपये घेतले. परंतु, जमीन परत देण्यास नकार दिला.या तिन्ही सावकारांवर कारवाई करण्यासाठी सहकार विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ही सावकरांवर कारवाई नाही. या सावकरांवर कारवाईसाठी आत्मदहन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe