‘शरद पवार गट’ विरूद्ध ‘पवार-शेलार गट’, पहा कोठे होणार अशी लढत

Published on -

Maharashtra News:मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत एक विचित्र राजकीय समिकरण पुढे आले आहे. अर्थात खेळात राजकारण नसते, असे म्हणतात. प्रत्यक्षात ते असते हा भाग वेगळा.

तर या निवडणुकीत ‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट समोरासमोर आले आहेत. मुंबई भाजपचे आशिष शेलार यांनी सोमवारी एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.

शेलार हे ‘शरद पवार-आशिष शेलार’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. भारताचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप पाटील यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी संदीप पाटील हे ‘शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे पूर्वीच जाहीर करण्यात आले होते.

मात्र, नंतर घडामोडी घडल्या. शरद पवार, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग एकत्रित आले आहेत. तर आधी उमेदवारी जाहीर झालेल्या संदीप पाटील आपण उमेदवारी मागे घेणार नाही,

असे जाहीर केले आहे. दरम्यान शरद पवार गटाने आपले नाव बदलून मुंबई क्रिकेट ग्रुप केले आहे. या निवडणुकीत एकूण ५१ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मतदार आहेत. त्यातील ३३ पुरुष क्रिकेटपटू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News