PPF Calculator : PPF मधील गुंतवणूक (PPF investment) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Investment) समजली जाते. जर तुमचेही PPF मध्ये खाते (PPF Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
कारण सरकारने PPF (PPF) मध्ये 5 मोठे बदल केले आहेत. त्यामुळे पैसे जमा करण्यापूर्वी हे बदल जाणून घ्या नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते.
तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 15 वर्षांनंतरही पैसे जमा न करता सुरू ठेवू शकता. यामध्ये पैसे जमा करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन नाही. मॅच्युरिटीनंतर, जर तुम्हाला पीपीएफ खात्याचा विस्तार करायचा असेल, तर तुम्ही आर्थिक वर्षातून एकदाच पैसे काढू शकता.
जर तुम्हाला पीपीएफ खात्यात जमा केलेल्या पैशावर कर्ज घ्यायचे असेल, तर अर्जाच्या तारखेच्या दोन वर्षे आधी, तुम्ही खात्यात उपलब्ध असलेल्या पीपीएफ शिल्लक रकमेच्या 25 टक्केच कर्ज घेऊ शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही 31 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज करत असाल, तर त्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्या PPF खात्यात 1 लाख रुपये असतील तर तुम्हाला 25 टक्के कर्ज मिळू शकते.
पीपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर कर्ज (Loan) घेण्याचा व्याजदर 2 टक्क्यांवरून एक टक्क्यांवर आणला आहे. कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड केल्यावर, तुम्हाला दोन किंवा अधिक हप्त्यांमध्ये व्याज भरावे लागेल. दर महिन्याच्या 1 तारखेपासून व्याज मोजले जाते.
पीपीएफ खाते उघडण्यासाठी फॉर्म ए ऐवजी आता फॉर्म-1 सबमिट करावा लागेल. PPF खाते 15 वर्षांनंतर (ठेवांसह) मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी वाढवण्यासाठी, फॉर्म H ऐवजी फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.
पीपीएफ खात्यातील गुंतवणूक 50 रुपयांच्या पटीत असावी. ही रक्कम एका वर्षात किमान 500 रुपये किंवा त्याहून अधिक असावी. संपूर्ण वर्षभरात PPF मध्ये जमा केलेली रक्कम 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. तुम्ही महिन्यातून एकदाच पीपीएफ खात्यात पैसे जमा करू शकता.