मुंबई- हॉलिवूड चित्रपट एव्हेन्जर एन्डगेमने भारतात तुफान कमाई केली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात टिकीट बुक केलं होतं.
अजूनही चित्रपटाच्या तिकिटाची ऑनलाईन विक्री हाऊसफुल आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर एव्हेन्जर एन्डगेमने जबरदस्त कमाई केली आहे.
चित्रपट
प्रदर्शनापूर्वीच एन्डगेमने कोटींचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या
पहिल्याच दिवशी जवळपास 63.21 कोटी रुपयांची कमाई केली होती. एव्हेन्जर
एन्डगेमने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
एव्हेन्जर एन्डगेम प्रदर्शित झाल्यापासून भारतात पहिल्या आठवड्यात 260 कोटींचा आकडा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या कमाईत कोणतीही कमी आलेली नाही.
चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 260.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
एव्हेन्जर एन्डगेममने बाहुबली 2चा रेकॉर्ड तोडला आहे. बाहुबली 2 ने एका आठवड्यात जवळपास 247 कोटी रुपयांची कमाई केली होती.