Buffalo Farming : पशुपालकांनो, ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू करा, घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत

Ajay Patil
Published:
buffalo farming

Buffalo Farming : मित्रांनो भारतात पशुपालन हा व्यवसाय गेल्या अनेक दशकांपासून केला जात आहे. असं सांगितलं जातं की पशुपालन हा व्यवसाय शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून केला जातो. पशुपालन शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असल्याने शेतकरी बांधवांना यातून चांगली कमाई होते. मित्रांनो पशुपालनात गायींचे, म्हशीचे, शेळ्यांचे, मेंढ्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे संगोपन केले जाते.

मात्र पशुपालक शेतकरी बांधव दुग्ध उत्पादनासाठी म्हशींचे संगोपन आपल्या देशात सर्वाधिक करतात. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील म्हशींचे संगोपन अधिक करत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांच्या मते म्हैस पालनातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगली कमाई होऊ शकते. मात्र यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी म्हशीच्या सुधारित जातींचे संगोपन करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी म्हशीच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण ज्या म्हशीच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत ती एक भारतीय वंशाची म्हशीची मजबूत जात आहे. असं सांगितलं जातं की म्हशीची ही जात चक्क वाघाला देखील फिरवून लावते.

मित्रांनो आम्ही ज्या म्हशीविषयी बोलत आहोत ती म्हैस आहे जाफराबादी. जाफराबादी म्हैस आपल्या मजबूत शरीर यष्टीमुळे चक्क वाघाला देखील हरवू शकते असे पशुपालक शेतकरी बांधव सांगत असतात. तसेच म्हशीची ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. तसेच भारतीय वंशाची ही म्हशीची जात भारतात पाळण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे जाणकार लोक नमूद करतात.

उत्कृष्ट दूध उत्पादन क्षमता :-  ही म्हैस वजनाने जड असून तिचे तोंड लहान आहे. या म्हशींचे वजन 800 किलो ते 1 टन पर्यंत असू शकते. या म्हशीचे शिंग वाकलेले असतात. मुर्राह म्हशींची शिंगे सुद्धा वक्र असतात पण मुर्राह म्हशींची शिंगे जास्त वक्र असतात आणि जाफ्राबादी जातीच्या म्हशींची कमी. या म्हशीच्या दुग्धशक्‍तीबद्दल बोलायचे झाले तर या जातीच्या म्हशी दररोज 30 लिटरपर्यंत दूध देऊ शकतात.

जाफराबादी म्हशींची बाजारातील किंमत :- गुजरातमधील अमरेली, पोरबंदर, जुनागढ यासह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते. देशाच्या इतर भागातही म्हशींची ही जात पाळतात. तुम्हालाही ही म्हैस खरेदी करायची असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता. या म्हशीची किंमत सुमारे दीड लाख रुपयापर्यंत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe