Video Life Certificate : जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा सुरु केली आहे. परंतु, ही सुविधा फक्त पेन्शनधारकांसाठी आहे.
या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना शाखेला भेट न देता शाखेचे अॅप किंवा वेबसाइटवर व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. केवळ पेन्शनधारकांसाठी सुविधा मिळणार आहे

प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत:
- शाखेच्या या सुविधेसाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, नाहीतर Pensionseva मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
- या वेबसाइटवर, शीर्षस्थानी असलेल्या ‘VideoLC’ लिंकवर क्लिक करा. अॅप्लिकेशनमध्ये, लँडिंग पेजवरून ‘व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट’ हा पर्याय निवडा.
- पेन्शन क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा आधार तपशील वापरण्यासाठी बँकेला अधिकृत करण्यासाठी बॉक्स चेक करा.
- ‘व्हॅलिडेट अकाउंट’ बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल
- त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्रे सबमिट करा आणि पुढे जा वर क्लिक करा.
- नवीन पृष्ठ आल्यानंतर तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉलसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा. एक पुष्टीकरण तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवले जाईल.
- परवानगीनंतर वेळापत्रकानुसार व्हिडिओ कॉलमध्ये सामील व्हा.
- त्यानंतर तुम्हाला तो पडताळणी कोड वाचावा लागेल. बँक अधिकाऱ्यासोबत कॉलमध्ये तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागेल.
- जर पडताळणी झाली तर तुम्हाला कॅमेरा स्थिर धरा जेणेकरून बँक अधिकारी तुमचा चेहरा कॅप्चर करू शकेल.
- शेवटी तुमची संपूर्ण माहिती टाकली जाईल. व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेटच्या स्थितीबद्दल पेन्शनधारकांना एसएमएसद्वारे सूचित करेल.