EPFO ​​released new guideline : दिलासादायक निर्णय! आता सतत फेटाळले जाणार नाही EPF चे दावे, नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Published on -

EPFO ​​released new guideline : नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या वर्गाचे सतत दावे फेटाळले जात होते. याबाबत कर्मचाऱ्यांनी ईपीएफओकडे तक्रार दिली होती.

यावर ईपीएफओने मोठा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे.या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणताही दावा फेटाळला जाणार नाही.

आता कोणताही दावा फेटाळला जाणार नाही

ईपीएफओच्या मते, दाव्यांची प्रक्रिया जलदगतीने करण्यात यावी आणि एकच दावा अनेक कारणांनी फेटाळला जाऊ नये. प्रत्येक दाव्याची कसून चौकशी केली जावी त्याशिवाय दावा नाकारण्याची कारणे प्रथमच सदस्याला कळवली जावीत. पीएफओकडे वेगवेगळ्या कारणांवरून दावा फेटाळल्याबद्दल अनेकदा तक्रारी प्राप्त होत आहेत.

नवीन सूचना जारी

याबाबत EPFO ने काही नवीन सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आता फील्ड ऑफिसेसनाही मासिक तत्सम पीएफ दावे फेटाळल्याचा अहवाल झोनल ऑफिसला पुनरावलोकनासाठी पाठवावा लागेल.

दाव्याची विहित मुदतीत कार्यवाही झाली पाहिजे. अनेक प्रकरणांमध्ये असेही पाहायला मिळत आहेत की दावे एका विशिष्ट कारणास्तव फेटाळण्यात आले. जेव्हा त्यात दुरुस्ती केली जाते तेव्हा ते पुन्हा सादर केले जातात. तेव्हा ते पुन्हा वेगळ्या कारणांसाठी नाकारले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe