New Year 2023 : ‘या’ सरकारी योजनेत मुलीच्या नावाने गुंतवा पैसे आणि नंतर मिळवा बक्कळ पैसा

Published on -

New Year 2023 : पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासोबत लग्नाची खूप काळजी असते. लग्न म्हटले की खर्च आलाच.त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता सरकारने एक योजना सुरू केली आहे.

या योजनेचे सुकन्या समृद्धी योजना असे नाव आहे. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवणूक मोठी रक्कम उभी करू शकता जी नंतर तुमच्या मुलींसाठी उपयोगी पडेल.

सुकन्या समृद्धी योजनेत खाते चालू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

या योजनेत तुम्हाला तुमच्या मुलींचे दहा वर्षांचे होण्यापूर्वी खाते उघडता येते. हे खाते 18 किंवा 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत चालवले जाते.

जर तुमची मुलगी 18 वर्षांची झाली तर या योजनेतून तिच्या शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढू शकता.

हे लक्षात ठेवा की या योजनेत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्जाची सुविधा मिळत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत तुमच्या मुलीचे खाते सहज उघडू शकता. तसेच व्यावसायिक बँकेच्या शाखेत जाऊन तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe