LPG Cylinder : या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्वयंपाकघरात आवश्यक असणारा गॅस सिलेंडर आता तुम्हाला स्वस्तात देखील बुक करता येणार आहे.
यासाठी तुम्हाला फक्त काही प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात मागच्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे.
एलपीजी सिलेंडरवर कॅशबॅक
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती मागील दिवसांच्या तुलनेत वाढल्या असून त्याचा परिणाम लोकांच्या खिशावर झाला आहे. मात्र, आता गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग केल्यास सिलिंडरच्या किमतीत काहीसा दिलासा मिळू शकतो. वास्तविक, आजकाल अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म LPG गॅस सिलेंडर बुकिंगवर कॅशबॅक ऑफर करत आहेत.
सिलेंडर कॅशबॅक
या कॅशबॅकमुळे एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सूट मिळू शकते, ज्यामुळे सिलिंडर स्वस्त दरात खरेदी करता येईल. आता Phone-Pe, Paytm सारख्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत, जेथून ऑनलाइन सिलेंडर बुकिंगवर कॅशबॅक मिळू शकतो. या अॅप्सद्वारे सिलेंडर बुक करण्यासाठी, तुम्हाला या अॅप्सवर जाऊन सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
हे पण वाचा :- Health Insurance : सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेत करा फक्त अर्ज ; होणार तब्बल 5 लाखांचा फायदा ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया