UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची यादी दिली आहे.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे तुम्ही खालील यादी वाचून प्रश्न व उत्तरे जाणून घ्या.
प्रश्न : काबाडकष्ट करणाऱ्यांचे हित हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते?
उत्तर : मजूर पक्ष
प्रश्न : शेड्युल कास्ट फेडरेशनमध्ये कोणता पक्ष विलीन झाला होता?
उत्तर : मजूर पक्ष
प्रश्न : भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे?
उत्तर : लोकशाही
प्रश्न : स्वराज्य पक्षाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : स्वराज्य दल
प्रश्न : महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तर : बेसॉल्ट
प्रश्न : अशा एका गोष्टीचे नाव सांगा जे तुम्हाला देण्यापूर्वी तुमच्याकडून घेतले जाते?
उत्तर : फोटो