Car Test Drive : नवीन कार घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी नाहीतर पश्चाताप करत बसाल

Ahmednagarlive24 office
Published:

Car Test Drive : नवीन वर्ष संपायला काही दिवस उरले आहेत. याच पार्शवभूमीवर अनेक कंपन्या आपल्या कार्सवर जबरदस्त सवलत देतात. त्यातच या नवीन वर्षात काही कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अनेकजण घाईघाईत कार खरेदी करत आहेत. प्रत्येक कारसाठी फीचर्स,मायलेज यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हदरम्यान या गोष्टी नक्की पहा.

कार घेण्याअगोदर करा हे काम

जेव्हा तुम्ही कार खरेदी कराल तेव्हा कारची टेस्ट ड्राइव्ह जरूर करा. जर तुम्ही असे केले तर ती कार तुमच्यासाठी योग्य आहे की नाही ते समजेल.

जाणून घ्या फीचर्स

टेस्ट ड्राइव्ह घेताना त्या कारच्या सर्व फीचर्सची माहिती जाणून घ्या. तसेच कार बुक करताना तिच्या सर्व फीचर्सची माहिती एका कागदावर दिली जाते. त्यामुळे आपल्याला फीचर्सची व्यावहारिकदृष्ट्या संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर शोरूमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला तुम्ही विचारू शकता.

घाई करू नका

एक लक्षात ठेवा की टेस्ट ड्राइव्ह दरम्यान घाई करू नये. गर्दीच्या ठिकाणी आणि महामार्गावर कार चालवा. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला वाहतुकीसोबतच रिकाम्या रस्त्यावर गाडीची क्षमता, हाताळणी कशी करावी याची अचूक माहिती मिळते.

कारमध्ये पाठीमागेही बसा

कार चालवण्यासोबतच आणखी एक गोष्ट करा. ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कार घेत असाल तर कारच्या पाठीमागच्या सीटवरही बसा. कारण असे केल्याने तुमच्यासाठी कुटुंबासाठी चांगली आहे की नाही ते समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe