New Year 2023 : शेवटची संधी ! आजच करा ही 4 कामे, नाहीतर होईल मोठे नुकसान

Published on -

New Year 2023 : उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण उद्यापासून कार पासून ते बँकेशी निगडीत काही नियमात बदल होणार आहे.

त्यामुळे तुमची यापैकी कोणती कामे शिल्लक राहिली असतील तर ती आजच पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला नवीन वर्षात मोठा दंड आणि मोठे नुकसान सहन करावे लागेल.

1. बुक करा कार 

उद्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2023  पासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, केआयए इंडिया तसेच एमजी मोटर या कंपन्या आपल्या कार्सच्या किमतीत वाढ करणार आहेत.

जर तुम्हाला यापैकी कोणती कार खरेदी करायची असेल तर आजच बुक करा. नाहीतर नवीन वर्षात तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

2. आजच जुना ITR भरा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मोठा दंड टाळायचा असेल तर आजच जुना ITR भरून टाका. जर गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 साठी म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयटीआर अजूनही दाखल केला नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी तो निकाली काढा.

काहींना 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करता आला नाही. त्यामुळे त्यांना फक्त विलंबित ITR दाखल करता येणार आहे.

3. बँक लॉकरच्या नियमात होणार बदल 

1 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासूनच सर्व बँकांच्या बँक लॉकरच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. RBI ने सर्व प्रमुख बँकांना त्यांच्या बँक लॉकर धारकांना 1 जानेवारी 2023 पूर्वी करार जारी करण्यास सांगितले आहे.

या नियमांनुसार, बँका त्यांच्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अयोग्य अटी किंवा शर्ती नसतील याची खात्री करणार आहेत. तसेच बँक आपल्या विद्यमान लॉकर ग्राहकांसोबत कराराचे नूतनीकरण करणार आहेत.

4. बँक ऑफ बडोदा विशेष एफडी

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या बँकेने काही दिवसांपूर्वी विशेष FD सुरू केली असून आज त्याचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या बँकेने 444 दिवस आणि 555 दिवसांच्या 2 एफडी काढल्या होत्या, ज्यामध्ये ग्राहकांना अनुक्रमे 5.75 टक्के आणि 6 टक्के व्याज दिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News