पुणे-अहमदनगर-नासिक रेल्वे मार्गाबाबत मोठं अपडेट ! ‘या’ गावातील बाधित शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठी नोटीसा, असा मिळणार जमिनीचा मोबदला

Published on -

Pune-Nashik Railway : पुणे नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. हा रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याना जोडण्यासाठी अतिशय कारगर सिद्ध होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे या तिन्ही शहरांदरम्यान वाहतूक सुरळीत होणार असून यामुळे कृषी क्षेत्राला, पर्यटनाला आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आता या रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमीन अधिग्रहीत करण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने खेड तालुक्यातीलं ज्या गावातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे त्या गावातील बाधितांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यातुन जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातीलं चाकण, आळंदी, केळगाव, गोलेगाव, सोळू, धानोरे, मरकळ, चऱ्होली खुर्द, रासे, भोसे, कडाचीवाडी, काळूस, वाकी बुद्रुक, खरपुडी खुर्द या 21 गावांमधून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.

या अनुषंगाने या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या जमिनी खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेतल्या जाणार असून या संदर्भातील जाहीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या रेल्वे मार्गामध्ये जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या नावे केल्या जाणार आहेत. यामुळे असा देखील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांसोबत विस्तृत अशी चर्चा होणार आहे.जमिनीचा मोबदला जिल्हास्तरीय समिती ठरविला आणि हा मोबदला संबंधित शेतकऱ्याला मान्य असल्याचं आणि सदर खरेदि देण्यास जमीन मालक तयार असल्याची संमती पत्रे देखील मागवली आहेत.

संबंधित बाधित शेतकऱ्यांनी संमतिपत्रे उपविभागीय अधिकारी खेड आणि उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्याकडे दाखल करावीत. या ठिकाणी संमती पत्र विहित नमुन्यात सादर करायची आहेत. शेतकऱ्यांना हा विहित नमुना संबंधित कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या जारी झालेल्या नोटिशीत खासगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन करावयाचे गट क्रमांक, संपादित करावयाचे क्षेत्र व संबंधित जमीन मालकांची नावे नमूद राहणार आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ज्या बाधित शेतकऱ्यांच्या काही हरकती असतील त्यांना 15 दिवसाच्या आत हरकत घेता येणार आहे.

निश्चितच हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाचा असून आता या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाने वेग घेतला असल्याने लवकरच हा रेल्वे मार्ग सर्वसामान्यांसाठी बांधून तयार होईल ही आशा आता बळावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News