Big relief Taxpayers : लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वीच आता करदात्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण काही लोकांना आता आयकरात मोठा दिलासा मिळाला आहे.
करात सवलत मिळावी आणि व्याजावर कर लागू करू नये ही मागणी ज्येष्ठ नागरिक अनेक दिवसांपासून करत होते. त्यांची ही मागणी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मान्य झाली आहे.
तर त्यांना आयकर भरण्याची गरज नाही
ट्विटनुसार, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून केवळ पेन्शन आणि बँक व्याज आहे, केवळ त्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना आयकर भरण्याचीही गरज भासणार नाही.
आगामी अर्थसंकल्पापूर्वी आयकरात सवलत देण्याबाबत चर्चेची फेरी सुरू असून नोकरदार लोक आयकर स्लॅबमध्ये सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र याआधी ज्येष्ठांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
As announced in Budget FY 2022-23, senior citizens above 75 years of age, having only pension and interest income, are now exempted from filing Income Tax Return. #PromisesDelivered pic.twitter.com/iuyIzyQPnJ
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) January 5, 2023
ही मागणी चर्चेत
भरलेल्या आरोग्य विमा प्रीमियमवरील कलम 80D वजावट मर्यादा वाढवा ही मागणी होत आहे. कोविड-19 नंतर या मागणीला वेग आला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली आहे ते कलम 80D अंतर्गत भरलेल्या प्रीमियमवर 50,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. जर त्यांच्या मुलांनी त्यांच्या वतीने प्रीमियम भरला तर त्यांना या कपातीचा लाभ घेता येईल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हा देशातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे त्यामुळे, वैयक्तिक करदात्यांना आशा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी कर सवलती जाहीर करतील.