Train Ticket : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे रेल्वे, विमान आणि बसची तिकिटे महाग होत चालली आहेत. मात्र भारतातून पाकिस्तानातमध्ये जाण्यासाठी रेल्वेचा खूप मोठा वाट होता. त्याचे तिकीट फक्त ४ रुपये होते.
४ रुपयांमध्ये आजकाल तर बिस्कीट पूड देखील येत नाही. मात्र भारतातून पाकिस्तानात जाण्यासाठी फक्त ४ रुपये लागायचे. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की महागाई किती वाढली आहे.
भारत ते पाकिस्तान दळणवळणाचे महत्वाचे साधन म्हणजे रेल्वे. सध्या जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ४ रुपयांत प्रवास करणे शक्य नाही. भारतातून पाकिस्तनमध्ये जाणाऱ्या एक ट्रेनचे तिकीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे तिकीट पाकिस्तानमधील रावळपिंडी ते अमृतसर दरम्यानच्या प्रवासासाठी आहे. या तिकिटावर नऊ जणांची नावे आहेत. जुन्या तिकिटांचे दर पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाला असाल.
हे तिकीट कधीचे आहे?
हे रेल्वे तिकीट १७ सप्टेंबर १९४७ रोजी खरेदी करण्यात आले होते. स्टॅम्प परिपूर्ण दिसत आहे. एसी-३ कोचसाठी आहे, असेही तिकीटात लिहिलेले आहे. लोकांनी पोस्टवर कमेंट केली की, स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानमध्ये नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोन होता. काहींनी हे तिकीट परदेशी नागरिकाचे असल्याचा अंदाज लावला. पूर्वी पाकिस्तानातून भारतात तिकीट खरेदी करणे सोपे होते, परंतु आता तसे नाही.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर अनेक लोक पाकिस्तातून भारतात आले आहेत. त्यातील काही लोकांचेच हे तिकीट असू शकते असे लोकांनी म्हंटले आहे.
पाकिस्तानला 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे. पाकिस्तानमधून रावळपिंडी ते अमृतसर या दोन्ही शहरामधील अंतर 276 किलोमीटर आहे. आज रेल्वेने इतके अंतर प्रवास करण्यासाठी तुम्हाला अंदाजे ३०० किंवा त्यापेक्षा जास्त रुपये खर्च येऊ शकतो.