Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी करणार धमाका! दिवाळीपूर्वी लॉन्च करणार ३ जबरदस्त कार…

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच बाजारात नवीन कार लॉन्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मारुती सुझुकीच्या कार जास्त मायलेज देत असल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.

मारुती सुझुकी कंपनी पुढील काही महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी ३ कार लॉन्च करणार आहे. SUV प्रकारातील या कार असणार आहेत. दिवाळीपूर्वी मारुतीकडून ७ सीटर कार देखील लॉन्च केली जाऊ शकते.

मारुती सुझुकी जिमनी

मारुतीकडून जिमनी नावाची कार ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच लवकरच ही कार बाजारात लॉन्च केली जाणार आहे. ही कार 1.5-लिटर K15B 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह आणली जाईल.

कारचे इंजिन 103bhp आणि 134Nm आउटपुट देईल. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित युनिट समाविष्ट आहे. यात सुझुकीची AllGrip Pro 4×4 ड्राइव्हट्रेन मिळेल. ही कार दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल – Zeta आणि Alpha.

मारुती सुझुकी 7-सीटर MPV

मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच 7-सीटर MPV कार लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये ADAS तंत्रज्ञानही दिले जाण्याची शक्यता आहे. ही कार इनोव्हा हायक्रॉसशी स्पर्धा करेल.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकी कंपनीकडून दिवाळीपूर्वी फ्रॉन्क्स नावाची कार बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. या कारला दोन इंजिन पर्याय 100bhp, 1.0L 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 89bhp, 1.2L ड्युअल-जेट NA पेट्रोलसह उपलब्ध असेल.

ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि AMT समाविष्ट असेल. बलेनो आणि नवीन ब्रेझा सारखेच इंटीरियर असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe