Budget 2023 : खुशखबर! ‘या’ योजनेतील गुंतवणूकदारांना सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

Published on -

Budget 2023 : चांगला परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. यातील काही योजना गुंतवणूकदारांना कमी वेळेत लखपती करतात. तर काही योजनेत काही वर्षांनंतर चांगला परतावा मिळतो.

अशातच आता याच गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण सरकार ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना एक मोठे गिफ्ट देणार आहे. लवकरच आर्थिक बजेट सादर होणार आहे. त्यात ही घोषणा केली जाऊ शकते.

1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनांतर्गत ज्येष्ठ नागरिक बचत योजना येते. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे, ज्यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुंतवणूक करता येते. तसेच, 55 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना जे सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेत गुंतवणूक करता येत आहे.

या योजनेत 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. या गुंतवणुकीचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा असून आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करमुक्त आहे.

2 . सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या लग्नासाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुलगी किंवा पालक या योजनेत खाते उघडू शकतात. कमीत कमी 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येते, तर जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. सध्या, सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याज दिले जात आहे.

मोदी सरकारचा अंतिम केंद्रीय अर्थसंकल्प गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. केंद्रीय वित्त मंत्रालय NITI आयोग आणि संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News