Goa Tourism : थंडीच्या दिवसामध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. मात्र काही पर्यटनाच्या ठिकाणी नियम आणि कायदे बनवण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणे चुकीचे ठरू शकते. तसेच तुमच्या अडचणी वाढू शकतात.
तुम्हीही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गोवा पर्यटन विभागाने नवे नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे पर्यटकांना अनिवार्य आहे.
गोव्यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक वाढल्याने गोवा पर्यटक विभागाकडून त्यांची गोपनीयता लक्षात घेऊन नवीन नियम जारी केले आहेत. परदेशी पर्यटकांसोबत फोटो काढणे आता तुम्हाला अडचणीत आणू शकते.
तुम्हाला जर विदेशी पर्यटकांसोबत फोटो किंवा सेल्फी काढायचा असेल तर तुम्हाला त्या पर्यटकांची परवानगी घ्यावी लागेल. विशेषतः सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहताना त्यांच्या गोपिनीयतेचा आदर करणे गरजेचे आहे.
गोव्याच्या पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
पर्यटकांना अपघातांपासून वाचवणे हाही या सल्लागाराचा एक उद्देश आहे. तसेच त्यांना खडक आणि समुद्रातील खडक यांसारख्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यापासून रोखण्यासाठी.
अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की खुल्या भागात स्वयंपाक करण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते. स्वयंपाकाची भांडी जप्त केली जाऊ शकतात. तसेच, 50,000 रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो.
कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी कशावरही काही लिहणे गुन्हा मानले जाऊ शकते. तसेच पर्यटक विभागाला लिहताना कोणती आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
पर्यटकांना अवैध खाजगी टॅक्सी भाड्याने घेणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांना पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेल/व्हिला किंवा निवासस्थान बुक करण्याचा सल्ला दिला जातो.
उघड्यावर दारू पिणे
गोव्यामध्ये अनेकजण खास दारू पिण्यासाठी जात असतात. मात्र समुद्रकिनारी किंवा उघड्यावर दारू पिणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. कारण पर्यटक विभागाकडून उघड्यावर दारू पिण्यास मनाई करण्यात आली आहे.