50 Hajar Protsahan Anudan : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तत्कालीन सरकारने त्यावेळी नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा दिला आणि 50 हजाराचे अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र तत्कालीन सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. कोरोना आणि सत्तांतरामुळे अनुदानाची अंमलबजावणी अडीच वर्ष खोळंबली.
दरम्यान आता राज्यात आलेल्या नवीन शिंदे फडणवीस सरकारने गेल्या महाविकास आघाडी सरकारचा 50,000 अनुदानाचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला असून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या योजनेअंतर्गत पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान या योजनेची दुसरी यादी देखील पोर्टलवर आली असून आता या यादीतील शेतकऱ्यांना देखील अनुदान वितरित केले जात आहे.
अशातच आता राज्य शासनाने या अनुदान वितरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजाराचे अनुदान देण्यासाठी आता शासनाने एक नवीन पोर्टल विकसित केल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे नवीन पोर्टल महाआयटीच्या माध्यमातून विकसित झाल आहे. या नव्याने तयार झालेल्या पोर्टलमुळे 50 हजार अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदानाची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.
मात्र यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. केवायसी केल्याने अपात्र शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यास यश मिळणार आहे. यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे जे शेतकरी अपात्र असूनही अनुदानाचा लाभ घेत होते त्यांना चांगला दणका मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितचं राज्य शासनाने विकसित केलेल्या या पोर्टलमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र असे असले तरी शिंदे सरकारने अनुदान वितरित करण्यास सुरवात करून जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यामुळे या योजनेचे पात्र शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. दरम्यान आता या नवीन पोर्टलमुळे या योजनेच्या अंमलबजावणीला वेग येणार असून लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.