UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे आम्ही खाली काही महत्वाच्या प्रश्नांची यादी दिलेली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/upsc-2021-result.jpg)
प्रश्न : लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा पाहिजे?
उत्तर : ५० सदस्य
प्रश्न : ‘वैराट’ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?
उत्तर : अमरावती जिल्हा
प्रश्न : भारतातील ७० टक्के लोकसंख्या कशावर अवलंबून आहे?
उत्तर : शेती
प्रश्न : महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या किती आहे?
उत्तर : ९ तुरुंग
प्रश्न : ‘काँग्रेस हा नारदाच्या सुभा’ आहे असे कोणी म्हटले होते?
उत्तर : महात्मा फुले
प्रश्न : मनुष्यासाठी ४० प्रकारची औषधे कोणत्या प्राण्यापासून बनवतात?
उत्तर : डुक्कर