Free Silai Machine Yojana : खुशखबर! मोदी सरकार देशातील सर्व महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन; असा करा ऑनलाईन अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

Free Silai Machine Yojana : देशातील महिलांसाठी मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. महिलांना घरबसल्या स्वतःच्या व्यवसाय करता यावा यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत सर्व महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे.

महिलांना आर्थिक स्थितीने मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी मोदी सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जात आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना सरकारच्या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीनचा लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे बेरोजगार महिलांना रोजगार मिळू शकतो. महिलांना स्वावलंबी होऊन याद्वारे चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

मोफत शिलाई मशीन योजना काय आहे?

केंद्र सरकारकडून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली आहे. याद्वारे महिला चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेमध्ये सर्व दुर्बल आणि असंघटित महिलांचा समावेश आहे.

ही योजना राबवण्यासाठी सरकारने 800 कोटी रुपयांचे बजेट तयार केले असून, त्याअंतर्गत देशातील सर्व राज्यांतील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिवणयंत्रे दिली जाणार आहेत. या योजनेंतर्गत महिलांचे विहित वय २० वर्षांवरून ४० वर्षे करण्यात आले आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेची मुख्य उद्दिष्टे

सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि कामगार वर्गातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा देशील या योजनेमागचा उद्देश आहे.

या योजनेमुळे महिला घरबसल्या शिवणकाम करून पैसे कमवू शकतात. शिवणकाम करून महिला पैसे कमवू शकतात आणि घरची आर्थिक स्थितीदेखील सुधारण्यास मदत करू शकतात.

योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये

मोफत सिलाई मशीन योजनेच्या मदतीने देशातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

ही योजना चालवण्यासाठी सरकारने 800 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

या योजनेच्या मदतीने सरकारने देशातील सर्व महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.

या योजनेंतर्गत सरकारने देशातील सर्व राज्यांमधील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिलाई मशीनच्या मदतीने सर्व महिला घरी बसून शिवणकाम करून स्वावलंबी होऊ शकतात आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक अटी?

या योजनेअंतर्गत केवळ भारतीय वंशाच्या महिलाच अर्ज करू शकतात.

कोणत्याही महिलेचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास तिला या योजनेतून वगळण्यात येईल.

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी वय 20 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

कोणत्याही महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

देशातील सर्व विधवा महिला आणि अपंग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्र

आधार कार्ड
प्रमाणपत्र
ओळखपत्र
अर्जदार अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
जर अर्जदार विधवा असेल तर तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र
मोबाईल क्रमांक
अर्जदाराचे समुदाय प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe