Ajit pawar : गौतमी पाटीलबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, राष्ट्रवादी कला विभागाकडून आली तक्रार

Ahmednagarlive24 office
Published:

Ajit pawar : सध्या गौतमी पाटील हीचा डान्स चर्चेचा विषय झाला आहे. तिचे हावभाव वेगळे असल्याने तिच्यावर टीका केली जाते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी असतात, आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावले जाते.

याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी नाराजी जाहीर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे कमीपणा आणला जात आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहेत. ते सर्वांना पाहता येईल अशाच प्रकारचे असले पाहिजेत. त्यामध्ये कोणताही अश्लील प्रकार असता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची परंपरा टिकली पाहिजे. कोणी चुकत असेल तर त्यांना अडवलं पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी लावणीबाबत मोठा निर्णय देखील घेतला असून राष्ट्रवादीकडून लावणीतील अश्लील नृत्याला बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या तरुणांच्या मनात फक्त गौतम पाटीलचा जळवा बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तिच्या डान्ससाठी तरुण येडे झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन तरुण तिचा कार्यक्रम ठेवत आहेत.

दरम्यान, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe