आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानपोटी 36 कोटी वितरित, तुम्हाला मिळालेत की नाही?

Published on -

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या योजनेचीं तत्कालीन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला अन ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजाराच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

निश्चितच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा होता. मात्र, 2020 मध्ये म्हणजेच निर्णयाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात राज्यासहित संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिली. यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला. मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाले. परंतु नवीन सरकारने हा निर्णय कायम ठेवला आणि याची अंमलबजावणी केली.

सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आता या योजनेत संदर्भात नांदेड जिल्हाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६२ हजार ५०४ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेने अपलोड केली आहे. या पैकी ३२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ३० हजार ७२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे.

तर २ हजार १७९ शेतकरी आधार प्रमाणीकरणाचे बाकी आहे. यापैकी 9321 शेतकऱ्यांना 36 कोटी 58 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान शासनाच्या माध्यमातून देऊ करण्यात आले आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान आता या योजनेअंतर्गत अनुदान वितरणासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधी पैकी शिल्लक असलेली रक्कम देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी एकूण 4700 कोटी रुपयांची तरतूद झाली होती.

यापैकी 3700 कोटी रुपये यापूर्वी मंजूर झाले होते आणि आता नुकतेच या महिन्यात एक हजार कोटी रुपयांची शिल्लक असलेली तरतुदीची रक्कम शासनाकडून वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News