Exchange mutilated notes : फाटलेल्या नोटा कशा बदलाव्यात ? ही आहे योग्य पद्धत

Published on -

Exchange mutilated notes : अनेक वेळा एटीएमधून फाटकी नोट येते, आपल्याकडून नोट फाटली जाते किंवा गडबडीत आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्याला फाटकी नोट देऊन जातो. जर ही नोट कमी किमतीची असेल तर आपल्याला काही वाटत नाही.

परंतु, जर हीच नोट जास्त किमतीची असेल तर आपल्याला चैन पडत नाही. परंतु, जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता ही नोट सहज बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त मध्यवर्ती बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल.

जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील तर त्या तुम्ही मध्यवर्ती बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोटा जमा करू शकता. या फाटलेल्या नोटांचे मूल्य इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येते.

जाणून घ्या आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे

खराब झालेल्या, फाटलेल्या नोटा, ज्यात डाग आहे किंवा आवश्यक संख्या गहाळ आहे किंवा नोटेचे दोन तुकडे असणाऱ्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) शाखेत किंवा कोणत्याही आरबीआय कार्यालयात कोणताही फॉर्म न भरता जमा करू शकता.

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • तुम्हाला फाटलेली चलनी नोट बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी, मध्यवर्ती बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे.
  • ‘ट्रिपल लॉक रिसेप्टेकल’ (TLR) नावाच्या बॉक्समध्ये तुम्ही सर्व तपशीलांसह नोट जमा करू शकता .
  • त्यासाठी तुम्हाला नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि जमा केलेल्या नोटांचे मूल्य यासारखे आवश्यक तपशील द्यावे लागणार आहेत.
  • वरील तपशील भरून नोटा सीलबंद लिफाफ्यात जमा करा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News