Anil Deshmukh : फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी, अनिल देशमुख नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी वाटले पेढे..

Published on -

Anil Deshmukh : गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांची अखेर सुटका झाली. त्यांना सुरुवातीला मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पण कोर्टाने नंतर त्यांची मुंबईबाहेर जाण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे अनिल देशमुख आज नागपुरात दाखल झाले.

तब्बल 13 महिन्यांनंतर ते नागपुरात दाखल झाले. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. या आरोपांमुळे त्यांना तब्बल 13 महिन्यांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावे लागले. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला.

देशमुख राहत्या घरी दाखल झाले, तेव्हा त्यांचे कुटुंबीय भावूक झालेले बघायला मिळाले. अनिल देशमुख हे नागपुरात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. देशमुख येणार असल्याची बातमी कळताच नागपुरातील कार्यकर्त्यांनी पेढे वाटायला सुरुवात केली.

तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती. देशमुख यांच्यावर क्रेनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार अनिल देशमुख यांच्या गळ्यात घालण्यात आला.

अनिल देशमुख नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचे घराबाहेर स्वागत केले. यावेळी देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय भावूक झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe