Alcohol drinkers : सावधान! दारूसोबत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, अन्यथा पडू शकते महागात…

Ahilyanagarlive24 office
Published:

Alcohol drinkers : देशात अनेकजण दारूचे सेवन करत असतात. मात्र दारूचे सेवन करत असताना अनेकजण चकणा म्हणून अनेक पदार्थ खात असतात. मात्र दारूसोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दारूसोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन महागात पडू शकते. चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते आणि ऍसिड रिफ्लक्स आणि ब्लोटिंग सारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

बीन्स आणि रेड वाईन टाळा

देशात अनेकजण जेवताना वाईन घेत असतात. मात्र जेवणात बीन्स किंवा मसूरापासून बनवलेले काहीही काही पदार्थ असल्यास ते टाळावे. यामध्ये लोह जास्त प्रमाणात असते. आणि दारू आणि ये पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने पोषक तत्वांचे शोषण रोखले जाते.

ब्रेड आणि बिअर टाळा

बिअर पित असताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजचे आहे. तसेच यासोबत ब्रेड खाणे टाळले पाहिजे. याचे कारण असे की दोन्ही गोष्टींमध्ये यीस्ट असते आणि तुमचे पोट एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात यीस्ट पचवू शकत नाही.

उच्च मीठ अन्न

जर तुम्ही दारूचे सेवन करत असताना उच्च मीठ असलेले अन्न खात असाल तर तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. असे पदार्थ दारूसोबत सेवन केल्यास पचनसंस्थेसाठी वाईट ठरू शकते.

चॉकलेट टाळा

दारूचे सेवन करत असताना किंवा नंतर चॉकलेट, कॅफीन किंवा कोकोचे सेवन करणे टाळावे. जर या पदार्थांचे सेवन केले तर गॅस्ट्रोच्या समस्या देखील वाढवतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe